Lokmat International News | जगतील राजकारणातील अनोखी घटना । हे राष्ट्रदक्ष वापरत नाहीत स्मार्टफोन

2021-09-13 4,805

एकीकडे स्मार्टफोनशिवाय राहण्याची कल्पनाच लोकांना असहय्य होत आहे तर दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मात्र आपण स्मार्टफोन वापरत नसल्याचं ठामपणे जगाला सांगत आहे. नुकताच त्यांना स्मार्टफोनवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी भलेही जग स्मार्टफोन वापरत असेल पण माझ्याकडे मात्र स्मार्टफोन नाही किंवा मी स्मार्टफोन वापरतच नाही असं सांगून त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले आहे.आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत फारसे सरसावलो नसल्याचंही त्यांनी कबुल केलं. २००५ पर्यंत आपल्याजवळ मोबाईल फोन नव्हता असंही पुतिन म्हणाले. गेल्यावर्षी पुतिन यांनी शालेय विद्यार्थ्यांशी भेट घेतली होती. त्यावेळी आपण कमीत कमी इंटरनेटचा वापर करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. इन्स्टाग्रामवर तुम्ही सक्रीय असता का? असा प्रश्न त्यांना काही विद्यार्थ्यांनी विचारला होता त्यावेळी मी दिवसभर काम करतो त्यामुळे मला या सर्व गोष्टींसाठी वेळ नाही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires